अखिल भारतीय रावळ (राऊळ) समाज महासंघ
WHY SMARTY?

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Maecenas metus nulla, commodo a sodales sed, dignissim pretium nunc. Nam et lacus neque. Ut enim massa, sodales tempor convallis et, iaculis ac massa.

CONTACT INFO
  • Address: PO Box 21132, Here Weare St,
    Melbourne, Vivas 2355 Australia
  • Phone: 1-800-565-2390
  • Email: [email protected]

!! प्रस्तावना !!

          आज आपण आपला समाज आपला समाज म्हणतो पण आज आपल्या समाजाची अवस्था काय आहे ? शैक्षणिक, आर्थिक बाबतीत आज आपला समाज कुठे आहे ? आपली एकूण संख्या किती आहे जी आहे ? आपण एक आहोत का ? आपला समाज किती प्रगत झाला आहे, हा विचार आपण कधी केला आहे का ? आपण खरोखर भटक्या या लेबल प्रमाणे आज ही भरकटलेले आहोत, मागास आहोत, मग ते आर्थिक बाबतीत असो किंवा शैक्षणिक बाबतीत असो हे कुठ तरी थांबल पाहिजे, यात बदल झाला पाहिजे. आज इतर समाज व आपला समाज यांची तुलना केली, विचार केला तर आपण खुप मागे आहोत कारण ईतर समाजामध्ये एकजुटता आहे, त्यांच्या संघटना आहेत ,पण आपण आज आपल्या-आपल्या कामात व्यस्त आहोत. आपल्याला समाज्याची आठवण कधी येते ? आपल्याला जेव्हा लग्न सोयरिक जमवायची असेल तेव्हा पण ते ही शक्य होत नाही कारण आपला विखुरलेला समाज असल्याकारणाने ते थोड़ अवघड होऊन बसल आहे. या सर्व बाबींचा विचार करता आपण एक असावे आपली प्रगती व्हावी आपलीही राज्यस्तरावर संघटना असावी. अधिक माहिती वाचा माहिती

!! बोध चिन्ह !!

!! एक संघ एक गती | हिच समाजाची प्रगती !!

अधिक माहिती माहिती माहिती

रावळ समाज

          राऊळ, रावळ, रावल, रावलीया ही जातीची नावे वेगवेगळ्या प्रांता प्रमाणे त्यांच्या बोली भाषेनुसार पडली गेली आहेत. त्यात राऊळ / रावळ या महाराष्ट्रीयन बोली भाषेतील शब्दांना इंग्रजानी राऊळ / रावळ असे केले आहे, त्यामुळे राऊळ / रावळ हे इंग्रज राजवटीचे उच्चाराचे देणे आहे.राऊळ ह्याचे इंग्रजांनी भाषेत रावळ करून टाकले, असो...! म्हणून आता आपण राऊळ, रावळ ह्यातील काय वापरावे, लिहावे हे आपण ठरवावे, जे आपण नेहेमी वापरतो ते वापरावे अथवा सरकार दरबाराचे जे दस्तऐवजानुसार जे झाले असेल ते उपयोगात आणावे.

अधिक माहिती वाचा माहिती

अखिल भारतीय रावळ ( राऊळ ) समाज महासंघ

          अखिल भारतीय राऊळ (रावळ) समाज महासंघ ही आपली राज्यस्तरीय संघटना उदयास आली आहे. त्यातून समाजाच्या कुटुंब माहितीचा फॉर्म तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या समाजाची माहिती जसे एकूण कुटुंब संख्या किती? हे कार्य हाती घेतले आहे; चौकटीबध्द जीवन जगणाऱ्या समाजाच्या पंखांना बळ देण्यासाठी वचनबध्द आहोत. समाजामध्ये असलेली लहान ,थोर, गरीब श्रीमंत ही दरी मिटवू या. सर्वत्र विखुरलेला समाज एकत्र करुन त्यांना एक संघ,एक गती, हीच समाजाची प्रगती या उक्ती प्रमाणे आपण वाटचाल करू, नव्हे आता सुरू आहे. एका छ्ताखाली समाज एकत्र आणण्याच्या या पवित्र कामास समाजाचे पाठबळ मिळताना पाहून आनंद होत आहे. समाजाचा प्रत्येक बांधव महासंघाच्या माध्यमातून जोडला जाणार आहे.

अधिक माहिती वाचा माहिती

संघटनेची प्रमुख उदिष्टे

1) महाराष्ट्रराज्य रावळ समाजाची खानेसुमारी करणे. 2) रावळ समाजाचे "रावळ प्रचारक त्रैमासिक घराघरत पोहचवने. 3) समाजातील परंपरे प्रमाणे मंत्र व माळ, दिवस पध्दती समजण्यासाठी पुस्तक तयार करणे. 4) वधु-वर सूचक समिती तयार करणे. 5) समाजाची वेब साईट तयार करणे. 6) मठ व मंदिर देखभाल व पुनर्जीवन करणे.
8) भावी काळात समाज मंदिर, मंगलकार्यालय, विद्यार्थांसाठी हॉस्टेल बांधणे. 9) समाज विकासासाठी निधि उभारणे. 10) समाजातील बेकार तरुणांसाठी रोजगार निर्मिति करणे. 11) दरवर्षी विद्यार्थी गुण गौरव सोहळा आयोजित करणे. 12) समाजातील दानशुर व्यक्तींचा सत्कार व समाज भूषण पदवी देऊन सन्मान करणे. 13) वधु-वर मेळावे आयोजित करणे.

!! एक संघ एक गती | हिच समाजाची प्रगती !!

आपला समाज एकत्र यावा, एक असावा हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आम्ही प्रत्येक जिल्यात समाज जागृती व एकता बैठक घेत आहोत.


आपला प्रतिसाद हिच प्रगतीची हाक

आपणा सर्वांचा वाढता प्रतिसाद व आपल्या संघटनेकडून असलेली अपेक्षा पाहता नक्कीच आमची जबाबदारी वाढली आहे.


पहिली एकता बैठक - स्थळ : पुणे

26 फेब्रुवारी 2017 रोजी पुणे येथे एकता मिटिंगचे बीज रोपण झाले. पुणे येथे झालेल्या बैठकीत राऊळ समाजाची राज्यस्तरीय संघटना तयार असणे ही काळाची गरज म्हणून आपली राऊळ समाजाची संघटना असावी हे एकमुखाने ठरले.

दुसरी एकता बैठक - स्थळ : मिरज

पुणे येथील एकता बीजचे मिरजेत झाले अंकुरात रुपांतर . 23 एप्रिल 2017 रोजी मिरज येथे दुसरी एकता बैठक पार पडली, त्यात संघटनेचे नामकरण ,संघटनेचे बोधचिन्ह याचे अनावरण तसेच कुटुंब माहिती फॉर्म वाटप झाले.

तिसरी एकता बैठक - स्थळ : संगमनेर

26 एप्रिल 2017 आणि 27 एप्रिल 2017 रोजी संगमनेर येथे तिसरी एकता बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. आपला प्रतिसाद व विश्वास हिच आमची प्रेरणा व आशीर्वाद म्हणून आपले पुढचे पाऊल व पुढची दिशा ठरवण्यासाठी रावळ के सब शेर चलो संगमनेर ......